कोल्हापुरातील दुकानांची वेळ वाढवली

कोल्हापुरातील दुकानांची वेळ वाढवली
प्रतिबंधीत क्षेत्राव्यतिरिक्त सर्व मार्केटस् व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत राहणार सुरु
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर, दि. 8: जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राव्यतिरिक्त सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले असून या आदेशाची अंमलबजावणी उद्या दि. 9 जुलैपासून होणार आहे.*
एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील. शॉपिंग मॉल्सबाबत यापूर्वी दिलेले प्रतिबंधित आदेश कायम राहतील. यापूर्वी अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व मार्केटस् व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या कालावधीत शासन निर्देशानुसार बदल करून आता अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व मार्केटस व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे .
उपरोक्त आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
Previous
Next Post »