कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य सेवेत स्वतःला झोकून देऊन आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टर, परिचारिका, परिचारक व रुग्णालय कर्मचारी या सर्वांचेच काम आपल्यासाठी मोलाचे आहे.
काल आयजीएम रुग्णालयात हायफ्लो मशीनला अचानकपणे आग लागून मशीन जळाल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण प्रसंगावधाने रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक परिचारिका, व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. परिणामी या मशीन वरील उपचार सुरू असणाऱ्या बाधित रुग्णांना त्वरित जंबो सिलेंडर च्या सहाय्याने ऑक्सिजन देऊन सुखरूप स्थळी हलवले. यावेळी आय.सी.यू हायफ्लो युनिटमधील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाधित रुग्णांचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याचे कौतुक करत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी रुग्णालयातील परिचारक असिफ मोमीन, वॉर्डबॉय अमित पाल, डॉ. प्रशांत कुंभार , इन्चार्ज परिचारिका सौ.मोरे, परिचारिका सौ. शेरखान, कर्मचारी लक्ष्मी जाधव (आया) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व आज परिचारिका दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक भरत शिंदे, जितू साळुंखे, कपिल शेटके, विजय पाटील आदी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon