इचलकरंजी कुष्णा पाणी पुरवठा जाॕकवेलची नविन पंप व दुरुस्ती नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी नी केली पाहणी.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्या मजरेवाडी येथील जॅकवेल परिसरातील इंटकवेलमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच याठिकाणी बसविण्यात येत असलेल्या नवीन पंपाच्या कामाची नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी मजरेवाडी येथे जावून पाहणी करत माहिती घेतली. यावेळी पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे उपस्थित होते.इचलकरंजी शहराला मजरेवाडी येथून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याठिकाणी असलेल्या इंटकवेलमधील गाळ काढण्याचे काम दोन वर्षातून हाती घेतले जाते.
त्यामुळेसा करण्यासह पंपावर पडणारा दाब कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या कामातील अडथळे दूर होतात. पुढील जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असल्याने तत्पूर्वी इंटकवेलमधून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजना अंतर्गत प्राप्त 1 कोटी 8 लाख 436 रुपयाच्या निधीतून मजरेवाडी येथे 540 अश्वशक्ती क्षमतेचे दोन पंप बसविण्यात येत असून ते कामही युध्दपातळीवर सुरु आहे.
या दोन्ही कामांची नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी मजरेवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत तातडीने कामे पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी जलअभियंता सुभाष देशपांडे, सहाय्यक अभियंता बाजी कांबळे ,शितल पाटील उपस्थित होते.
लई भारी न्यूज नेटवर्क
इचलकरंजी प्रतिनिधी
कुमार पाटील
ConversionConversion EmoticonEmoticon