इचलकरंजी पोलीस दल व माणुसकी फाउंडेशन यांच्याकडून शहरातील निराधारांना मोठा आधार
कोविड- १९ महामारिने सर्व जगामध्ये थैमान घातले आहे. भारतामध्ये सन २०२० मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के लॉकडाउन झाले होते. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे प्रशकीय यंत्रणा कामास लागल्या. सध्या भारतामध्ये कोविड- १९ ची भारतामध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. इचलकरंजी शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यांचे काम बंद झाल्यामुळे ते बेरोजगार झाले आहेत. मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊन मुळे पुढे बेरोजगारीमुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आले होते.
वरील अनुभव पाठीशी असल्याने कोणी बेरोजगारी मुळे किंवा परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळू नये याकरिता अशा बेरोजगार, कष्टकरी, गरीब,निराधार, गरजू लोकांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करून इचलकरंजी पोलीस दल, पोलीस बॉईज व सामाजिक कार्यकर्ते व सेवाभारती हॉस्पिटल यांनी एकत्र येऊन व मा.श्री. शैलेश बलकवडे (पोलीस अधीक्षक कोल्हापूर), तसेच सौ जयश्री गायकवाड (अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग कॅम्प इचलकरंजी) यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी व माणुसकी फाउंडेशन व माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष रवी जावळे यांचे मार्फतीने अशा लोकांना मोफत अन्न व त्यांना लागणारे गरजे नुसार औषधे पुरवण्याचे काम आज पासून हाती घेण्यात आले आहे आणि अशा सामाजिक कामाकरिता इचलकरंजी शहरातील काही समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते, व्यवसायिक, उद्योजक अशा दानशूर लोकांनी सढळ हाताने मदत केली आहे. असे वक्तव्य मा.श्री. विकास जाधव ( डी. वाय.एस.पी.इचलकरंजी ) यांनी केले. तसेच लोकांना विनंती केली की घरी रहा सुरक्षित रहा.
लई भारी न्यूज नेटवर्क
इचलकरंजी प्रतिनिधी
कुमार पाटील
ConversionConversion EmoticonEmoticon